Old man hit by bike : थरारक.. रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला भरधाव मोटरसायकलने उडवले - दुचाकीची वृद्धाला धडक बारामती घटना
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - भरधाव वेगाने जाणाऱ्या यामाहा मोटरसायकलने धडक ( Bike hit old man news Baramati ) दिल्याने एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना बारामती मोरगाव ( Old man hit by bike ) रस्त्यावर करावागज मध्ये घडली. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मोहन लष्कर, असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लष्कर बारामती मोरगाव रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या यामाहा मोटरसायकलने त्यांना धडक दिली. अपघातानंतर जवळपास तीस फुटापर्यंत लष्कर उडून पडले. त्यामुळे, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामाहा दुचाकी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.