Oil Tanker Fire In Amravati : अमरावती-नागपूर महामार्गावर तेलाच्या टँकरला आग - अमरावती-नागपूर महामार्गावर तेलाच्या टँकरला आग
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - अकोल्याकडून नागपूरला जाणाऱ्या तेलाच्या टँकरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. अमरावती नागपूर महामार्गावर ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा बंबानी आगीवर नियंत्रण आणले आहे. आगीमुळे टँकर पूर्णतः जळाला आहे. या भीषण घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, टँकर मधून आगीच्या ज्वाळा आणि धूर सर्वदूर दिसत असल्यामुळे या भागात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले ( Oil Tanker Fire In Amravati ) होते.