Uddhav Thackeray Birthday : मातोश्रीवर शिवसैनिकांची मोठी गर्दी; उद्धव ठाकरेंना प्रतिज्ञापत्र रुपी शुभेच्छा - उद्धव ठाकरे 62 वा वाढदिवस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ( Shiv Sena chief Uddhav Thackeray birthday ) 62 व्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. राज्यभरातून शिवसैनिक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आले असून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यभरातून सदस्य नोंदणी आणि आणि प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे शिवसैनिक मातोश्री वर ( Matoshree Mumbai Shivsainik ) घेऊन आले आहे. या वाढदिवसाला आपल्याला पुष्पगुच्छ किंवा इतर भेटवस्तू न देता प्रतिज्ञा पत्रा चे गठ्ठे भेट म्हणून देण्यात यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला देखील शिवसैनिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. तसेच आमदार-खासदारांनी बंडखोरी केली असली तरी सामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्याच मागे उभा आहे. ज्या नेतेमंडळींनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली अशा सर्वांना निवडणुकीतून धडा शिकवू असा इशारा येथे जमलेल्या शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांना देण्यात येत आहे.