२००२च्या दंगलीत मोदींचा हात आहे असे कधीच नव्हतो म्हणालो : जफर सरेशवाला - Zafar Sareshwala
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4302712-thumbnail-3x2-jafar.jpg)
२००२ ची गुजरात दंगल आणि या दंगलीमध्ये 50 लाख मुस्लीमांचे जीवन कसे धोक्यात आले होते, याविषयी नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे प्रशंसक जफर सरेशवाला यांनी भाष्य केले आहे.
'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाचे माजी कुलगुरू सरेशवाला यांनी, विद्यमान समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोदींच्या बाजूने आपण बोललो होतो हे असे स्पष्ट केले. ते म्हणाले, "समाजातील कोणीतरी" तिथे पोहोचणे, त्यांची बाजू घेणे गरजेचे होते.
तसेच, त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले की, "मुस्लीम समुदाय असे कधीच म्हणाले नव्हते की दंग्यांच्या मागे मोदींचा हात आहे". परंतु, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी निर्दोष मुस्लीमांच्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
जफर यांनी पुढे म्हटले की, महेश भट्ट यांच्या पाठिंब्याने त्यांना बराच आत्मविश्वास मिळाला. भट्ट हे चळवळीचा अविभाज्य भाग होते. "मोदींशी असलेला लढा वैयक्तिक नव्हता. माझे कुटुंब नेहमी दंगलीचा बळी ठरले आहे." असेही ते म्हणाले.