Sharad Pawar Criticized Raj Thackeray : 'प्रबोधनकारांचे लिखाण वाचणाऱ्यांना प्रश्न पडणार नाहीत' - शरद पवारांची राज ठाकरेंवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - शरद पवार हे फुले शाहू आंबेडकर यांचेच नाव का घेतात, असे विचारतात. प्रबोधनकार ठाकरे यांनी या संदर्भात खूप लिखाण केले ते वाचले तर असा प्रश्न कुणी विचारणार नाही, असा टोला राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लागवला. ज्यावेळी संपूर्ण समाज अस्वस्थ होता. त्यावेळी या समाजाचे सत्व जागे करण्याचे काम करून शिवाजी महाराजांनी राज्य उभे केले. शिवाजी महाराजांनी उभे केलेले राज्य हे भोसल्याचे राज्य नव्हते ते रयतेचे राज्य होते. फुल्यांनी आणि सावित्रीबाई यांनी सर्वसामान्यांना शिकवले. आज फुले असतील नसतील पण त्याचे योगदान संपणार नाही, असे मत मुफ्ता शिक्षक संघटनेच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी व्यक्त केले.