कोरोनाच्या प्रभावात राज्याची उपराजधानी लॉक डाऊन - नागपूर लॉक डाऊन
🎬 Watch Now: Feature Video
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील अनेक महानगरांना लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर शहरात आज लॉक डाऊनचा पहिला दिवस आहे. शहरातील प्रत्येक बाजारपेठत कडकडीत बंद असल्याचे बघायला मिळत आहे. आवश्यक आस्थापना वगळता सर्वत्र बंद असला तरी नागरिकांची तुरळक गर्दी रस्त्यांवर बघायला मिळाली. एकंदरीत नागपुरात काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी....