Shahi Tharoor : ..तर देशात लोकशाही राहिली नाही असंच म्हणावं लागेल.. जीएसटीवरून शशी थरूर यांचा केंद्रावर निशाणा - Shashi Tharoor inflation in India

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 19, 2022, 5:11 PM IST

नवी दिल्ली : देशात महागाई वाढली आहे. खाद्यपदार्थांसह इतर अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. असे असताना केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याने महागाईचा भडका उडण्याची शक्यता ( Shashi Tharoor inflation in India ) आहे. सरकारने अशा प्रकारे कर लावून सर्वसामान्यांची पिळवणूक केली जात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी ( shashi tharoor reaction On New GST Rates ) केली. पावसाळी अधिवेशनाच्या ( Monsoon Session 2022 ) पहिल्या दिवशी संसदेबाहेर ते बोलत होते. सरकार लोकांना दिलासा देण्याऐवजी पैसे वसूल करत असेल तर या देशात लोकशाही राहिली नाही असेच म्हणावे लागेल. रुपया सध्या नीचांकी पातळीवर आहे. रुपया कमकुवत झाला म्हणजे सरकार कमकुवत असं मोदी २०१४ मध्ये म्हणाले होते. मग आताचे सरकार किती कमकुवत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.