MNS aggressive against PFI पुण्यात पीएफआय विरोधात मनसे आक्रमक...रस्त्यावर पाकिस्तानी झेंडे जाळत केलं आंदोलन, पाहा व्हिडीओ - flag of Pakistan was burnt
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16468995-thumbnail-3x2-mns.jpg)
पुण्यासह राज्यभरात एनआयएने (NIA) छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( पीएफआय ) (PFI) संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. याच्या निषेधार्थ परवा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात केली. घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे (pakistan zindabad slogans) देखील लावण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला आहे. या विरुद्ध आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील अलका चौक येथील रस्त्यावर येऊन आंदोलन (MNS aggressive against PFI in Pune) करण्यात आलं. तसेच यावेळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तानचा झेंडा देखील जाळण्यात ( flag of Pakistan was burnt) आला. यावेळी आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...पाहा व्हिडीओ