Mehboob Imam Hussain : 27 वर्षांपासून गेटवे ऑफ इंडियावर शिवरायांना मानवंदना देणारा 'मेहबूब', पाहा VIDEO - Gate Way Of India Drum Playing
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15223287-thumbnail-3x2-mehboob.jpg)
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांना गेली सत्तावीस वर्ष नित्यनियमाने मानवंदना देण्याचे काम गेटवे ऑफ इंडिया ( Gate Way Of India ) येथे सूर्यास्ताच्या वेळी नौबत वाजवून केले जाते. हे मानवंदना देण्याचे काम अखंडपणे करणारी व्यक्ती आहे मेहबूब इमाम हुसेन ( Mehboob Imam Hussain ). एक कट्टर शिवप्रेमी असलेल्या मेहबूब यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हे काम करणार असल्याचे ठरवले आहे. इतकच नाही तर मेहबूब यांनी याच शिवप्रेमातून सोमवारी शिवजयंतीच्या निमित्ताने इथं येणाऱ्या पर्यटकांना जिलेबी देखील वाटली. यातूनच मेहबूब यांच्या शिवप्रेमाची प्रचिती येते. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रत्येक मावळा जीवापाड प्रेम करत होता. याला साडेतीनशे वर्ष उलटल्यानंतरही मेहबूब यांच्या रुपाने निष्ठावंत मावळा महाराजांवरील त्यांचे प्रेम व्यक्त करत आहे.