सरकार अल्पमतात हे राजभवन राष्ट्रपती किंवा न्यायालयात ठरत नाही - उल्हास बापट मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्रात सुरू असलेला सत्ता संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने सर्वोच्च न्यायलायात धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी होत आहे. एकनाथ शिंदे यांची बाजू ज्येष्ठ वकील हरीश साळवे तर महाविकास आघाडीच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. यावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, दोन दिग्गज वकील सामोरा समोर आहे. त्यामुळे आज निकाल लागणं शक्य नाही. तसेच जे सांगितल जात आहे की सरकार अल्पमतात आहे. हे राजभवन, राष्ट्रपती भवन किंवा सर्वोच्च न्यायालयात ठरत नाही. त्यासाठी विश्वासदर्शक ठरवाला सामोरे जाणे अनिवार्यच आहे, असं बापट यांनी स्पष्ट केलं ( ulhas bapat on floor test ) आहे.
Last Updated : Aug 10, 2022, 9:52 PM IST