Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंच्या विरोधात शिवसैनिकांचे मुंडण आंदोलन - एकनाथ शिंदेंच्या विरोधात शिवसैनिकांचे मुंडण आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यभर रोष व्यक्त केला जात आहे. त्यात आता क्रांती चौक भागात शिवसैनिकांनी मुंडण आंदोलन केल. एकनाथ शिंदे यांच्यासह बाहेर गेलेल्या आमदारांमुळे पक्षाची वाताहात होत असली तरी आम्ही उद्धव ठाकरेसोबत आहोत, अशी भूमिका आंदोलनकर्ते शिवसैनिकांनी केली आहे. ज्या आमदारांना निवडूण आणण्यात आम्ही रक्ताच पाणी केलं. आज तेच आमदार गद्दारी करत आहेत. मात्र, आम्ही सेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याच औरंगाबादच्या आंदोलक कार्यकर्त्यांनी सांगितलं. भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी ( shivsainik agitations against eknath shinde in auragabad ) दिला.
TAGGED:
Maharashtra Political Crisis