Members of Legislative Council : विधान परिषदेवर साधू-महंतांना स्थान मिळावे - महंत अनिकेत देशपांडे

By

Published : Jul 8, 2022, 3:18 PM IST

thumbnail
नाशिक - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये विधान परिषद सदस्यांच्या ( Members of Legislative Council ) नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र हे सदस्य निवडताना महाराष्ट्रातील काही साधु-महंतांचा विचार व्हावा, अशी मागणी नाशिकच्या महंतांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात शिंदे गट आणि भाजप एकत्रित येत नवीन सरकार स्थापन केले आहे, अशात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदार निवडले जाण्याचे प्रक्रिया सध्या तेजीत आहे. राज्यपाल शिक्षण, क्रीडा, कला, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रातून विद्वान व्यक्तींना विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्त करतात. या व्यक्तींच्या ज्ञानाचा फायदा सभागृहाबरोबरच राज्याच्या प्रगतीला व्हायला हवा. हा त्यामागचा हेतू असतो. विधान परिषद विद्वानांचे वरिष्ठ सभागृह समजले जाते. या सदस्यांची मुदत सहा वर्ष असते. आता महाराष्ट्रात 12 सदस्यांची विधान परिषदेवर निवड होणार आहे. नाशिकच्या आखाडा परिषदेचे काही साधू महंतांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांमधून किमान दोन सदस्य संस्कृती जपणारे कोणीही विद्वान, पंडित, शास्त्री, आचार्य, साधू महंत असले पाहिजे अशी मागणी महंत अनिकेत देशपांडे ( Mahant Aniket Deshpande ) यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.