VIDEO : उक्कलगाव परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - बिबट्या उक्कलगाव शिवार
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे भक्ष्याच्या शोधात निघालेल्या बिबट्याने पुन्हा एकदा शेतकर्यांना दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. काल रात्री 10 वाजेच्या सुमारास टॉवरजवळील डीपी शेजारीच दबा धरून बसलेला बिबट्या आढळून आला. पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. उक्कलगावमधील प्रवरा नदीपात्रात बिबट्याचा वावर कायमच असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहेत. निखिल जगधने यांनी बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत शेतकर्यांना माहिती दिली आहे.