Khargone Violence CCTV : मध्य प्रदेशातील खरगोन हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 15, 2022, 1:28 PM IST

भोपाळ- मध्य प्रदेशात रामनवमीच्या दिवशी ( Ramnavami celebration in MP ) आयोजित करण्यात आलेल्या उत्सवादरम्यान झालेल्या हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज ( khargone violence CCTV footage ) समोर आले आहे. व्हिडिओमध्ये काही लोक दगडफेक करताना आणि तलवारी हवेत फिरविता दिसत आहेत. हा व्हिडिओ खरगोनमधील घाटी रोड मुल्लन वाडी जामा मस्जिदच्या ( Ghati Road Mullan Wadi Jama Masjid ) मागील असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक व्यक्ती वाहनांवर तलवारीने हल्ला करताना दिसत आहे. यादरम्यान हल्लेखोर तोंड झाकून हल्ला करत असल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. आतापर्यंत 100 आरोपींना ताब्यात घेण्यात ( khargone viral video ) आले आहे. ईटीव्ही भारत या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.