Jabalpur Mandir Robbery : पहिल्यांदा मागितली देवाची 'माफी'; मग टाकला मंदिरात डाका; पाहा चोरीचा VIDEO - चोरी मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
जबलपुर - चोरीचे अनेक मार्ग तुम्ही पाहिले असतील, पण असा चोर तुम्ही क्वचितच पाहिला असेल, ज्याने मंदिरात चोरी करण्यापूर्वी देवाकडे माफी मागितली आणि त्यानंतर स्वतःच्या मंदिरातही चोरी केली. जबलपूरमधून चोरीचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पाटण सुखा या गावात चोरट्याने चोरी करण्यासाठी मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर हात जोडून माता महालक्ष्मीसमोर डोके टेकवले आणि केलेल्या चुकीची माफी मागितली. यानंतर मंदिरातील तीन दानपेट्या चोरून हा चोरटा फरार झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ( Jabalpur Mandir Robbery )