Threat To Uday Samant : उदय सामंत यांना रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधकांकडून जीवे मारण्याची धमकी - Industries Minister Uday Samant
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी :उद्योग मंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) यांना रिफायनरी विरोधकाकडून जीवे मारण्याची धमकी Death threat to Industries Minister Uday Samant देण्यात आली आहे. रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशी यांनी भर सभेत मंत्री उदय सामंत यांना धमकी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जिल्ह्यात सध्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन वातावरण ( Nanar Refinery Project ) तापले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना रिफायनरी विरोधात असणाऱ्या आंदोलकांनी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.