Gutkha Seized By Jalna LCB : जालन्यात कर्नाटकातून येणारा ५४ लाखांचा गुटखा कंटेनरसह जप्त.. एलसीबीची कारवाई - कंटेनरमध्ये कर्नाटकातून आणलेला गुटखा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 17, 2022, 3:46 PM IST

जालना : स्थानिक गुन्हे अन्वेषण ( Local Crime Branch Jalna ) विभागाच्या पथकाने सापळा रचून आज सकाळी कारवाई करत जालना जिल्ह्यातील हसनाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत ( Hasanabad Police Station Jalna ) असलेल्या राजूर शहरातून अवैध गुटखा विक्री करणारे कर्नाटक राज्यातूंन विक्रीसाठी आलेले कंटेनर जप्त केले ( Illegal Gutkha Seized In Jalna ) आहेत. कर्नाटक राज्यातून एका मोठ्या कंटेनरमध्ये ( Gutkha From Karnataka In Container ) अवैधरित्या हिरा कंपनीचा गुटखा विक्रीसाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना लागली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे हसनाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजूर शहरात ( Rajur City Jalna ) सापळा लावून एम एच 46, एफ-6127 कंटेनर जप्त करून त्यामधून हिरा कंपनीच्या गुटख्याची भरलेले अंदाज ५४ लाखाचा गुटखा व कंटेनर जप्त करत ही मोठी कारवाई करत राज्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या टोळीला मोठा दणका दिलाय. या कारवाई दरम्यान पोलिसांना अवैध गुटखा विक्री करणारी अंतरराज्यीय टोळी हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.