Gorewada Zoo Fire : आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील जंगलाला आग; आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश - गोरेवाडा जंगल आग
🎬 Watch Now: Feature Video

नागपूर - गोरेवाडा प्रकल्पातील युनिट दोनमध्ये आज ( रविवारी ) दुपारच्या सुमारास लावा-दाभा गावच्या दिशेने जंगलास आग लागली. यात हवेमुळे आगीने लगेच उग्र रुप धारण करत दूरवर पसरली. या आगीमुळे गोरेवाडातील अंदाजे १५० हेक्टर ( 150 hectare fire in Gorewada ) संरक्षित भागात मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाचे कर्मचारी तसेच अग्निशामक दलाच्या सुमारेच तासाच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतिही जिवित हाणी झाली नाही. तसेच ही आग विझवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या ( Gorewada Zoo Nagpur ) दिशेने ही आग पोहचू शकली नाही. यातच पर्यटक आणि प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुपारपासून गोरेवाडा सफारी बंद करण्यात आली असल्याची माहिती गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक आणि प्राणिसंग्रहालय संचालकांनी दिली आहे.