fishing boat sunk मध्य समुद्रात बोट बुडाली, 19 मच्छिमारांची सुखरूप सुटका - बोट मध्य समुद्रात बुडाली
🎬 Watch Now: Feature Video
कन्याकुमारी : मुत्तम ग्राम येथील 19 मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. 24 तारखेला शनिवारी पहाटे समुद्राच्या मध्यभागी मासेमारी करत असताना अनपेक्षितपणे लाट उसळली आणि बोट बुडू लागली ( fishing boat sunk in middle sea ). बोटीत असलेल्या १९ मच्छिमारांनी योग्य वेळी समुद्रात ऊडी मारून बचावले. त्यावेळी तेथून जाणाऱ्या इतर बोटीतील मच्छीमारांनी समुद्रात अडकलेल्या १९ मच्छिमारांची सुखरूप सुटका करून ‘निकश’ या बोटीने त्यांना मुत्तम मासेमारी बंदरात पाठवले. कुलाचल कोस्टल पोलीस याचा तपास करत असताना बोट बुडाल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.