अखेर 'तो' बिबट्या जेरबंद... - finally leopard catch at pune
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - गेली अनेक दिवसापासून जुन्नर तालुक्यातील डिंगोरे परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला रविवारी पहाटेच्या सुमारास अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने या परिसरात अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले करून प्राण्यांना ठार केले होते. तर माणसांवरही हा बिबट्या हल्ले करत होता. त्यामुळे बिबट्याची या परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती.