Leopard Cubs Dink Milk : शेतकऱ्याने अकरा दिवस पाजले बिबट्याच्या बछड्याला दूध, पाहा व्हिडिओ - अहमदनगर न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - माणसाला प्रेम केल्यानंतर कोणाचाही लळा लागतो. त्याचप्रमाणे एका बिबटाच्या बछड्याला शेतकरी कुटुंबाचा लळा लागला होता. ते त्याला रोज दूध पाजत असत. काही दिवसापूर्वी अहमदनगर जिल्हातील राहाता तालुक्यातील लोणी खुर्दमध्ये जालिंदर विखे यांच्या ऊसाची तोड सुरु होती. तिथे एक बिबट़्याच पिल्लु आढळुन आले. शेतात बिबट्याचे पिल्लू सापडल्यानंतर प्राणी मित्र विकास म्हस्के यांना त्याची माहिती देण्यात आली. त्यांनी बिबट्याच्या पिल्लाचे निरीक्षण केले असता शेपटीला जखमी झाल्याचे आढळुन आले. त्यानंतर वन विभागाच्या मदतीने पशु वैद्यकीय अधिकारी श्रीकांत घोरपडे यांनी त्या पिल्लावर काही दिवस उपचार केले. दरम्यान त्या पिल्लाच्या भरण पोषणाची जबाबदारी शेतकरी कुटुंबावर आली. दररोज त्याला बाटलीने दूध पाजले जात होते. त्याची आणि आईची भेट व्हावी यासाठी रोज संध्याकाळी ते पिल्लु सापडले. त्या जागी नेऊन ठेवले जायचे जेणे करुन त्याची आई येऊन त्याला घेऊन जाईल. मात्र अकरा दिवस प्रयत्न करुनही त्याची आई आली नाही. अखेर या अकरा दिवसात त्या पिल्लाचा शेतकरी कुटुबालाही चांगलाच लळा लागला होता. रोज सकाळ संध्याकाळीच संध्याकाळी दुध पाजण्यासाठी बुट्टया ( पिल्लाच ठेवलेल नाव ) हाक मारली की ते पिल्लु लगेच जवळ यायचे. हा लळा मात्र त्या पिल्लाला नैसर्गिक आधिवास मिळावा, यासाठी ते पिल्लु जड अंतःकरणाने वन विभागाच्या स्वाधीन केले गेले. ( Leopard Dink Milk ) ( Leopard cubs were being milked by farmer )