Video : वृद्ध महिलेचा मृतदेह खाटेवर ठेवून कुटुंबाने केली १० किलोमीटर पायपीट.. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - छत्तीसगडमधील दंतेवाडा
🎬 Watch Now: Feature Video
दंतेवाडा ( छत्तीसगड ) : गरीबी माणसाला खूप काही करायला भाग पाडते. छत्तीसगडमधील दंतेवाडा (Chhattisgarh Dantewada ) येथे मृतदेह घेऊन जाण्यासाठी पैसे नसल्याने एका कुटुंबावर त्यांच्या घरातील वृद्ध महिलेचा मृतदेह खाटेवर घेऊन जाण्याची वेळ आली (dead body being carried in cot Kuakonda block). मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करता न आल्याने खाट उलटी करून त्यावर महिलेचा मृतदेह ठेवण्यात आला. पुढे एक पुरुष आणि मागे दोन महिलांनी हा मृतदेह खांद्यावर उचलून घेऊन पायीच जाणे पसंत केले. या सर्वांना मृतदेह घेऊन टिकनपाळ ग्रामपंचायतीत जावे लागले. रेंगानार ते टिकनपालमध्ये सुमारे 25 किलोमीटरचे अंतर आहे. मृतदेह खांद्यावर घेऊन हे चौघे कोणाच्याही मदतीशिवाय पायी चालत निघाले होते. त्यांनी 10 किमीचा प्रवास पायी चालत केला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुआकोंडा (Kuakonda Police Dantewada ) पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची व्यवस्था करून मृतदेह गावी पाठवला.