Rebel MLAs Celebrated in Goa : एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा जल्लोष - छत्रपती शिवाजी महाराज
🎬 Watch Now: Feature Video
पणजी (गोवा) - एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडल्यानंतर गोव्यात असणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी जल्लोष साजरा ( Rebel MLAs Celebrated in Goa ) केला. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली. शिंदे यांचे अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर गोव्यात असणाऱ्या शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांनी हॉटेल बाहेर येऊन एकनाथ शिंदे यांचा जय जयकार केला. सोबतच आनंद दिघे यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी माध्यमांना विजयाची खूण करत या निर्णयाचे स्वागत केले. दुपारी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांचे नाव देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्यानंतर आज कन्वेन्शन सेंटर हॉटेलमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी जल्लोष साजरा केला. तालावर ठेका धरत हे आमदार एकमेकांना शुभेच्छा देत होते.
Last Updated : Jul 3, 2022, 2:03 PM IST