Little Boy Pushpa Dialogue Viral Video : चिमुकला म्हणतो, 'मैं झुकेगा नहीं...'; एकदा VIDEO पाहाच... - चिमुकला म्हणतो मैं झुकेगा नहीं
🎬 Watch Now: Feature Video
पुष्पा या सुपरहिट चित्रपटाचा ( Pushpa movie viral dialogue ) मुलांवर जोरदार परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. आजही सोशल मीडियावर या चित्रपटातील प्रसिद्ध डॉयलॉग 'मैं झुकेगा नहीं...' यावर अनेक मंडळी व्हिडिओस् तयार करत आहेत. याच प्रसिद्ध डॉयलॉगचा फिवर आता लहान मुलांमध्ये पाहायला मिळत आहे. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या मुलाला त्याच्या पालकांकडून काठीचा धाक दाखवत घाबरवले जात आहे. याच वेळी हा चिमुकला रडत रडत 'मैं झुकेगा नहीं...' ( mai jhukega nahi...) हा डॉयलॉग म्हणताना दिसून येत आहे. मुलाची ही स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना हसू आवरत नाहीय. ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी या चिमुकल्याचा व्हिडिओ लोकांना आकर्षित करत आहे.