ठाणे : सासरा सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना भिवंडी शहरात घडली आहे. 20 वर्षीय पीडित सुनेला तिच्या वडिलांकडं सोडण्याच्या बहाण्यानं सासऱ्यासह त्याच्या मित्रानं पीडितेला भिवंडीतील एका खोलीत कोंडून ठेवलं. त्यानंतर पीडितेच्या आई वडिलांसह भावाला ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. "याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचारी सासऱ्यासह मित्रावर अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सासऱ्यासह मित्र फरार असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी दिली आहे.
पीडिता विवाहिता मूळची राजस्थानची : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय पीडिता विवाहिता मूळची राजस्थान राज्यात इथली राहणारी असून तिचे आई वडील मुंबईत राहत आहेत. दरम्यान 30 जानेवारीला 42 वर्षीय नराधम सासरा पीडित सुनेला वडिलांकडं सोडण्याच्या बहाण्यानं सोबत भिवंडीत स्वतःच्या घरी घेऊन गेला. त्या ठिकाणी पीडितेला डांबून ठेवत तिच्यावर सासऱ्यासह त्याच्या मित्रानं 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत पीडितेवर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे पीडितेला मोठा हादरा बसला आहे. ही या घटना उघडकीस आल्यामुळे समाजातून संताप व्यक्त होत आहे.
गुन्हा दाखल होताच सासऱ्याचा पोबारा : याप्रकरणी 18 फेब्रुवारीला पीडित सुनेच्या तक्रारीवरुन सासऱ्यासह त्याच्या मित्राच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात भान्यासंतेच्या कलम 64, 127(4), 351 (3), 74, 3(5) प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी माणिक होळकर करत आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांच्याशी संपर्क साधला असता अत्याचाराचा गुन्हा दाखल होतच आरोपी सासरा आणि त्याचा मित्र फरार झाला. पोलीस पथक या दोघांचा शोध घेत असल्याचं सांगत लवकरच दोन्ही आरोपी पकडले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :