Dusshera 2022 तुळजाभवानी मंदिरात दसरा उत्सव उत्साहात साजरा - enthusiasm in Tuljabhavani temple
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा Kulswamini Tuljabhavani Devi of Maharashtra दसरा म्हणजे सीमोल्लंघन सोहळा आज पहाटे मोठ्या उत्साहात पार पडला. गेली नऊ दिवस तुळजाभवानी देवीचे नवरात्र उत्सवात अलंकार पूजा करण्यात आल्या त्यानंतर देवीचा मुख्य उत्सव म्हणजे दसरा पार पडला. देवीची मूर्ती पालखीत ठेवून देवी स्वतः मंदिराबाहेर भाविकांना येऊन दर्शन देते. गुलाल व फुलांच्या उधळनाने आणि आई राजा उदो उदोच्या जयघोषाने दसरा साजरा करण्यात आलाय. देवी महिषासुर दैत्यासोबत नऊ दिवस देवी युध्द खेळत होती. महिषासुर दैत्याचा देवीने वध केल्यानंतर साजरा होणारा विजय उत्सव म्हणजे विजयादशमी दसरा अशी आख्यायिका सांगितली जाते. तुळजाभवानी देवीची मूर्ती चल मुर्ती असुन देवीला आज आपल्या सिहासनावरुन बाहेर आणले जाते. यावेळी देवीच्या मुर्तीला एकशे आठ साड्या गुंडाळून देवीचे माहेर असलेल्या अहमदनगर येथुन मानाच्या पालखीतुन देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. विजयादशमी दसरा उत्साहात साजरा करण्यात आला.