Ajit Pawar Speech : अजित पवारांच्या भाषणावेळी कांदा उत्पादक शेतकरी बसले गळ्यात कांद्याच्या माळा घालून - Yeola Ajit Pawar Sabha
🎬 Watch Now: Feature Video
येवला (नाशिक) - येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पाचे ( ShivShrushti Project ) भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या शुभहस्ते तर मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण चालू असताना तीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून बसले होते. यावेळी कांदा भावात सुधारणा व्हावी, याकरता उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधावे याकरीता शेतकरी गळ्यात माळा घालून बसले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण संपल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याच्या गळ्यातील कांद्याच्या माळा जमा करत या तिन्ही शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर काही वेळानंतर सोडून देण्यात आले.