panchganga overflow in kolhapur : कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदी पात्राबाहेर, महापुराची भीती - पंचगंगेला पूर
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ( Heavy rains in Kolhapur ) पंचगंगा नदी पात्राबाहेर ( Panchganga Overflow ) पडली आहे. कोल्हापूर शहरामध्ये सकाळपासून पावसाने उसंत घेतली असली तरी राधानगरी, करवीर, पन्हाळा तालुक्यात मात्र अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. सद्यस्थितीत राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास पुन्हा एकदा कोल्हापूरला महापुराला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. 8 ते 9 जुलै पर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सुद्धा सर्व तयारी केली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच संपूर्ण पुरस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.