Drainage Water Seeped House : पुण्यातील रजपूत विट भट्टी परिसरात घरात शिरले ड्रेनेजच पाणी.... - Drainage Water Seeped House
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Heavy rains in Pune ) असून शहर संपूर्ण जलमय झालेले आहे. अशातच पुण्यातील एरंडवणे येथील राजपूत वीट भट्टी ( Rajput Brick Kiln ) येथील परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने ( Drainage water seeped house) अनेक नागरिकांना संकटाला सामोरे जाव लागत आहे. वारंवार महापालिकेच्या ( Pune Municipal Corporation Administration ) कर्मचाऱ्यांना सांगून देखील फक्त आश्वासन मिळत असल्याने येथील स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घरात पाणी शिरल्याने तसेच दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे.