Ajit Pawar Nashik : महाराष्ट्रात हुकूमशाही चालणार नाही; अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावले - पमुख्यमंत्री अजित पवार नाशिक
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांनी मशिदींच्या भोंग्याच्या मुद्यावरून सरकारला 4 तारखेचे अल्टिमेटम दिला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, येथे हुकूमशाही चालणार नाही. तसेच शरद पवार यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही, असे म्हणत राज ठाकरे यांना उत्तर दिले. शिवतीर्थावर बसून वक्तव्य करणे सोपे आहे, पण केसेस तर कार्यकर्त्यांवर होतील, असेही पवार यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी भाषणात जे मुद्दे मांडले त्याची पोलीस तपासणी करतील, जर कोणी असे चिथावणीखोर बोलत माथी भडकवत असेल तर पोलीस उचित कारवाई करतील, असेही अजित पवार म्हणाले.