हरिद्वार सिडकुलमध्ये दिसली मगर, बघ्यांची गर्दी; पाहा व्हिडिओ - Crocodile seen in haridwar industrial area Sidcul
🎬 Watch Now: Feature Video
हरिद्वार (उत्तराखंड) - केल्विन केअर फॅक्टरीजवळ असलेल्या नाल्यातून एक मगर बाहेर आल्याने हरिद्वारच्या औद्योगिक क्षेत्र सिडकुलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मगर बाहेर आल्याची माहिती मिळताच पाहणाऱ्यांची घटनास्थळी गर्दी झाली होती. याबाबतची माहिती सिडकुल पोलिसांना मिळाली. त्यानंतर टीमने तासाभराच्या प्रयत्नानंतर अखेर या मगरीला पकडले. तीला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.