Industrial Training Institute of Sri Saibaba Sansthan : अखिल भारतीय व्‍यवसाय परीक्षेमध्‍ये उत्‍तीर्ण विद्यार्थ्‍यांचा दिक्षांत समारंभ कार्यक्रम

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 18, 2022, 5:40 PM IST

देश औद्योगिक क्रांती करीत असताना आय.टी.आय. प्रशिक्षण घेतलेल्‍या प्रशिक्षणार्थ्‍यांना यापुढील काळात अतिशय उज्‍वल भवितव्‍य असल्‍याचे प्रतिपादन संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी सांगितले. अखिल भारतीय व्‍यवसाय परीक्षेमध्‍ये उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांचा आयोजित करण्‍यात आलेल्‍या दिक्षांत समारंभ कार्यक्रमात (Passed Students Convocation Program) केले. दिक्षांत समारंभ हा पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या धर्तीवर केंद्र सरकारने या वर्षापासुन विश्‍वकर्मा दिवसाचे १७ सप्‍टेंबर औचित्‍य साधुन औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थाचे विद्यार्थ्‍यांसाठी सुरु केलेला आहे. (Convocation Program in shirdi) याप्रसंगी, श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थाचे टुल अण्‍ड डायमेकर व्‍यवसायातील प्रशिक्षणार्थी प्रविण गायकोट याचा राज्‍यात द्वितीय व साई मोरे याचा राज्‍यात तृतीय क्रमांक आला. तसेच मेकॅनिकल ट्रॅक्‍टर या व्‍यवसायाचा प्रशिक्षणार्थी दिपक जगताप याचा राज्‍यात तृतीय क्रमांक आल्‍याबद्दल संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्‍ते स्‍मृतिचन्‍ह व प्रमाणपत्र देवुन त्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला. तसेच संस्‍थेतील आकरा व्‍यवसायातुन प्रथम तीन क्रमांकाने उत्‍तीर्ण झालेल्‍या प्रशिक्षणार्थ्‍यांचाही सत्‍कार करण्‍यात आला. तसेच यावर्षी श्री साईबाबा औद्योगिक प्र‍शिक्षण संस्‍थेचा निकाल ८९ टक्के लागल्‍याबद्दल बानायत यांनी सर्वांचे अभिनंदन (All India Business Examination Passed Students) केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.