Supreme Court Hearing : लोकशाहीच्या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय व्हावा - घटनातज्ज्ञ उल्हास बापट - लोकशाहीसाठी न्यायालयाने लवकर निर्णय घ्यावे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना आज ( बुधवारी ) शिंदे गटातील 16 आमदारांच्या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालय सुनावणी पार पडली असता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात ( Uddhav Thackeray and Shinde group Supreme Court hearing ) आला. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तर शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही पक्षातच असून सदस्यत्व सोडले नसल्याचा दावा केला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयने यावेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगत उद्या म्हणजेच गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. कोर्टाने भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय घ्यावे. कारण हा निर्णय देशभरातील लोकशाहीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिली आहे.
Last Updated : Aug 3, 2022, 4:54 PM IST