Celebration In Pune : पुण्यात एकनाथ शिंदे समर्थकाकडून जल्लोष साजरा; फटाके वाजवले, गुलाल उधला, पेढे वाटले - पुण्यात जल्लोष
🎬 Watch Now: Feature Video

शिवसेना पक्ष प्रमुखांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis )तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील, असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) असतील असे जाहीर केले. त्यामुळे पुण्यात एकनाथ शिंदे समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी फटाके वाजवत, गुलाल उधळत, पेढे वाटत जल्लोष साजरा ( Celebration In Pune ) केला आहे. याचाच आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी.