thumbnail

By

Published : Aug 8, 2022, 7:44 AM IST

ETV Bharat / Videos

Truck Hit Car : कारला ट्रकने 500 मीटरपर्यंंत खेचत नेले, अंगावर शहारे आणणारा पहा व्हिडिओ

मैनपुरी - उत्तरप्रदेशच्या मैनपुरी येथे एका ट्रकने कारला धडक ( Uttar Pradesh Car Truck Accident ) देत कार चक्क 500 मीटरपर्यंत खेचत पुढे नेली. समाजवादी पार्टीनेच नेते यांची ही कार होती. मैनपुरीमध्ये सपाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यादव यांच्या कारला ट्रकचालक नुसती धडक ( Truck Hit Car ) देऊन थांबला नाही तर त्यांची कार रस्त्यावर 500 मीटरपर्यंत खेचली. अंगावर शहारे आणणारे असे हे दृष्य होते. लोकांनी या ट्रकचालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो थांबला नाही. या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मैनपुरीचे एसपी कमलेश दीक्षित यांनी सांगितले की, ट्रकने धडक दिल्याने सपा नेत्याची कार 500 मीटरपर्यंत खेचली गेली. ट्रक चालकाला इटावा येथून अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.