- मेष (ARIES) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सहावा भागात असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिकदृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र आणि कुटुंबीयांसह दिवस आनंदात घालवाल. जास्त लोकांच्या संपर्कात याल. व्यापारी वर्ग व्यापारवाढ व नियोजन करू शकतील. आपल्या हातून लोकहिताचे एखादे काम होईल.
- वृषभ (TAURUS) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा भागात असेल. आज आपल्या विचारांचा मोठेपणा आणि वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वाद-विवाद ह्यात यशस्वी व्हाल. वाचन-लेखनात रस घ्याल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. कष्टाचे पूर्ण चीज झाले नाही तरी आपण पुढेच जात राहाल. पचनक्रियेची समस्या उदभवुन प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.
- मिथुन (GEMINI) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या भागात असेल. आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आईच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्यानं प्रकृती बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा. पाणी आणि द्रव पदार्थ घातक ठरतील. जमीन, मिळकत यावर आज चर्चा करू नका.
- कर्क (CANCER) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा भागात असेल. आजचा दिवस कामात यश आणि नव्या कामाचा प्रारंभ ह्यासाठी अनुकूल आहे. मित्र आणि स्वकीयांचा सहवास आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. भावंडांशी सलोखा राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल. आर्थिक लाभ आणि समाजात आदर-सत्कार मिळेल. विरोधकांना पराभूत कराल. कोणाच्या प्रेमात पडाल.
- सिंह (LEO) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा भागता असेल. आज दूरस्थ स्नेही आणि नातलग ह्यांच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळं लाभ होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आपले वाक्चातुर्य इतरांची मने जिंकेल. निर्धारित कामात यश मिळेल. आयोजन आणि अतिविचार संकट निर्माण करतील. स्त्री मित्र मदतरूप ठरतील.
- कन्या (VIRGO) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज आपल्या वैचारिक समृद्धी आणि मोहक वाणीमुळं लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीनं लाभदायक आहे. प्रकृती उत्तम राहील व मन सुद्धा प्रसन्न राहील. आप्तेष्टांशी सुसंवाद साधल्यामुळं सुख आणि आनंद मिळेल. धनलाभ व प्रवास होईल.
- तूळ (LIBRA) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज आपलं बोलणं आणि व्यवहार ह्यावर आपणास संयम ठेवावा लागेल. कुटुंबीय आणि इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता आहे. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. आज अडचणींमुळं मनःशांती लाभणार नाही. त्यासाठी आपणास प्रयत्न करावं लागतील.
- वृश्चिक (SCORPIO) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. पत्नी आणि संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरी-व्यवसायात संधी मिळून उत्पन्न वाढेल. मित्रांसह सहलीला जाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. वडीलधार्यांच्या सहकार्यामुळं प्रगती करू शकाल.
- धनू (SAGITTARIUS) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज यश, कीर्ती, प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळं पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापार- व्यवसायासाठी प्रवास घडू शकतो. इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.
- मकर (CAPRICORN) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज बौद्धिक कार्यआणि व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य, लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील. विरोधक, प्रतिस्पर्धी यांच्याशी चर्चा तसेच अनावश्यक खर्चापासून दूर राहा.
- कुंभ (AQUARIUS) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज अवैध काम आणि नकारात्मक विचारां पासून दूर राहावं. खूप विचार आणि संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आरोग्य बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. ह्यातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
- मीन (PISCES) : बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. दैनंदिन कामातून बाहेर पडून आज आपण सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहलीस जाऊ शकता. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलावंत किंवा कारागीरांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी साठी अनुकूलता लाभेल. दांपत्य जीवनात जवळीक निर्माण होईल. सार्वजनिक जीवनात मान-सन्मान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -