ETV Bharat / state

आनंदाची बातमी! ऑक्टोबर, नोव्हेंबरचे 'लाडकी बहीण योजने'चे पैसे 'या' तारखेला मिळणार - Ajit Pawar On Ladki Bahin Yojana

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : सध्या राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा बोलबाला आहे. तर या योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे. परंतु ऑक्टोबर, नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2024, 10:55 PM IST

बीड Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : सध्या राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा बोलबाला आहे. या योजनेसाठी एक कोटींहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तसंच योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे.

जनसन्मान यात्रेत केली घोषणा : समाजातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचे हे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी परळीत दिली. त्याचप्रमाणे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात 10 ऑक्टोबरपर्यंत देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी जनसन्मान यात्रेत केली.

परळी शहरात जनसन्मान यात्रा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचं आयोजन परळी शहरात करण्यात आलं होतं. लाडक्या बहिणींच्या सशक्तिकरणाच्या दृष्टीने तसेच परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींशी आणि नागरिकांशी अजित पवार यांसह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संवाद साधला. शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील मैदानात अभूतपूर्व सभा पार पडली.

10 ऑक्टोबर पर्यंत देणार पैसे : यावेळी बोलताना अजित पवार यांनी सांगितलं की, आम्ही लोकांना वाऱ्यावर सोडत नाही. आपल्याला विकास साधायचा असेल तर बीड-परभणीमध्ये विमानतळ होणं अत्यावश्यक आहे. तरच एमआयडीसी, कारखानदारीत रोजगार निर्मिती होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणारा पक्ष आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 'लाडकी बहिण योजने'चे पैसे आम्ही 10 आँक्टोबरपर्यंत देणार आहोत. हे पैसे स्वतः साठी वापरा. तर ही योजना महिलांना सन्मानांनी राहाता यावे यासाठी आणली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. आनंदाची बातमी!,'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; कुणाला 4500 तर कुणाला 1500 रुपये - Ladki Bahin Yojana
  2. 'लाडक्या बहिणी'चा तिसरा हफ्ता कधी जमा होणार? किती कोटी खर्च - Ladki Bahin Yojana
  3. "जनतेत संभ्रमावस्था पसरवू नये...", नितीन गडकरींच्या 'त्या' विधानावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - Devendra Fadnavis On Nitin Gadkari

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.