"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊच शकत नाही", अमित शाह यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर - Ajit Pawar On Amit Shah - AJIT PAWAR ON AMIT SHAH
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 1, 2024, 10:46 PM IST
बीड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यानुसार भाजपचा आज मुंबईतील दादर येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अमित शाह यांनी "2029 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात स्वबळावर सरकार आणायचं आहे," असं वक्तव्य केलं. अमित शाह यांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. 1985 नंतर चाळीस वर्षात राज्यात एका पक्षाचं सरकार कधीचं आलं नाही. इतर राज्यांची आणि महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीत वेगळी आहे. भाजपाच्या नेत्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.