Burning Car In Aurangabad : पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या कारला अचानक आग, पाहा Video - कारच्या इंजिनमध्ये अचानक आग
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या कारच्या इंजिनमध्ये अचानक आग ( car caught fire at petrol pump ) लागल्याची घटना घडली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.ही घटना फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा येथे घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास पालं फाटा येथील जय पेट्रोलियम या पंपावर फोर्ड कंपनीची कार घेऊन एकजण आला. इंधन भरत असताना अचानक गाडीच्या इंजिनमध्ये धुर निघायला सुरुवात ( Sudden fire in car engine ) झाली. पाहता पाहता धुर वाढला ही बाब गाडी चालक आणि पंपावरील कर्मचाऱ्यांना लक्षात आली. त्यांनी तातडीने आग विझवण्याचे सिलेंडर घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली. तात्काळ इमर्जन्सी बटन आणि ऑफीस बंद करून तीन फायर बोटलनी गाडी विझवण्यात ( fire extinguished through fire extinguisher cylinder ) आली. वेळीच प्रयत्न झाल्याने पुढील दुर्घटना टळली.
Last Updated : Jul 6, 2022, 2:38 PM IST