VIDEO : गंगेत वाहून चाललेल्या दोन मुलींचे प्राण भारतीय सैनिकांनी वाचवले.. पहा 'रेस्क्यू ऑपरेशन' - ऋषिकेशमध्ये राफ्टिंग करत असताना गंगा नदीत पडल्या दोन मुली
🎬 Watch Now: Feature Video
ऋषिकेश ( उत्तराखंड ) : ऋषिकेशमध्ये गंगा नदीमध्ये राफ्टिंग करत असताना गंगा नदीच्या जोरदार प्रवाहात दोन मुली वाहून चालल्या ( girls flowing in Ganga while rafting ) होत्या. या मुलींना भारतीय लष्कराच्या जवानांनी दोरीच्या साहाय्याने बाहेर ( army personnel rescued girls ) काढले. सध्या या दोन्ही मुलींची प्रकृती ठीक आहे. भारतीय सैनिकांनी केलेल्या या बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राफ्टिंग टीमच्या एका सदस्याने प्रसंगावधान राखत दोन्ही मुलींना पाण्यात बुडण्यापासून वाचवले.