Ajit Pawar On Bawankule कावळ्याच्या शापाने कधी गाय मेलेली पाहिली आहे का? बावनकुळेंना दादांचा बारामती स्टाईल टोला - BJP NCP war over Baramati

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 9, 2022, 1:12 PM IST

पुणे : दोन दिवसाआधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बारामतीचा गड आम्ही नक्कीच जिंकू असे विधान केले होते. याबाबत विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारले असता पवार यांनी बारामती स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, कावळ्याच्या शापाने कधी गाय मेलेली तुम्ही पाहिली आहे का? ( Ajit Pawars criticism of Bawankule ) नवीन नवीन अध्यक्ष झाले की, बारामतीत येतात. कारण बारामतीत आल्यावर मीडिया बातमी उचलून धरते. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज शहरातील विविध गणेश मंडळांना भेट दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. बारामतीत माझे काम बोलते. माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा त्याचा बारामतीकर नक्की विचार करतील, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.