Ahmedabad Hit and Run case : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीला बोलेरो वाहनाने दिली धडक, पाहा व्हिडिओ - वस्त्राल हिट अँड रनचे सीसीटीव्ही फुटेज

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 25, 2022, 10:34 PM IST

Updated : Jun 25, 2022, 10:41 PM IST

अहमदाबाद : शहरात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हिट अँड रन प्रकरणांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका व्यक्तीला बोलेरो वाहनाच्या चालकाने धडक देऊन पळ ( Ahmedabad Hit and Run case ) काढला. गंभीर जखमी तरुणाचा जागीच मृत्यू झाला ( Accidental Death in Ahmedabad ) . या अपघातात बोलेरो पिकअप व्हॅनच्या चालकाचा निष्काळजीपणा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला ( CCTV footage of Vastral hit and Run ) आहे. अहमदाबाद I विभाग वाहतूक पोलिसांनी बोलेरोच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला (Ahmedabad I Division Traffic Police ) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश प्रजापती हे शुक्रवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास अहमदाबाद शहरातील वस्त्राल भागात कॅनरा बँकेच्या पुढे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. दरम्यान, मागून येणाऱ्या बोलेरो कारच्या चालकाने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी शैलेश प्रजापती यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर चालक पळून गेला. चालकाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आजूबाजूच्या लोकांनी केली आहे.
Last Updated : Jun 25, 2022, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.