तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला वाचवले.. पाहा व्हिडिओ - बिबट बचाव अभियान वाढोणा
🎬 Watch Now: Feature Video
जालना - विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. भोकरदन तालुक्यातील वाढोणा शिवारातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार यांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पवार यांच्यासह वनपरिक्षेत्र कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, विहीर अरुंद आणि पंधरा फूट खोल असल्याने विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा टाकणेही शक्य नव्हते. त्यामुळे, बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या पथकाला मोठी कसरत करावी लागली. कर्मचाऱ्यांनी विहिरीच्या शेजारी असलेले लिंबाचे झाड तोडून विहिरीमध्ये आडवे टाकले. झाड विहिरीमध्ये आडवे पडताच बिबट्या झाडाच्या फांद्यांवर चढून विहिरीबाहेर आला. विहिरीबाहेर आलेला बिबट्या जंगलात निघून गेला.