VIDEO : कोल्हापुरात राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन - कोल्हापूर यड्रावकरांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहेत. यामुळे आक्रमक झालेले शिवसैनिक राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. तर या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनासाठी यड्रावकर यांचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर जमा झाले. राजेंद्र पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू असून परिसरात सध्या तणावाचे वातावरण पसरले. दरम्यान काहीअनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.