Pench Tiger : जंगलात जाण्यापूर्वीच वाघोबाचे दर्शन घडते तेव्हा; पाहा VIDEO - पेंच वाघ मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - विदर्भात मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभली आहे. वाघाची एक झलक पाहण्यासाठी लोक जंगल पिंजून काढतात. पण, नागपूरच्या जवळील पेंचमधील खुर्सापार गेट जवळचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बारस नामक वाघिणीचा हा व्हिडिओ आहे. ज्यात सफारी गेटवर वाघिणीचे दर्शन झाले आहे. पर्यटक सफारी गेटवरून जंगलाच्या दिशेने जिप्सीने जाण्याच्या तयारीत असताना वाघीण गेटजवळ काही अंतरावर झाडाआड वाघीण उभी आहे. त्यामुळे जंगलात जाण्यापूर्वी गेटवरच वाघोबाचे दर्शन झाल्याने जंगल सफारी सुरू होण्यापूर्वीच आनंद पर्यटकांना झाला. तेच काही पर्यटन पुढे निघाले असताना त्यांना वाघ दिसला, त्यानंतर मागे असलेल्या जिप्सीतील पर्यटकांना दिसताच त्यांनी हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला आहे. सध्या वाघोबाला पाहण्यासाठी जंगलात मोठया प्रमाणात गर्दी होत ( tiger seen at gate before entering forest ) आहे.