ETV Bharat / entertainment

मजरूह सुलतानपुरी यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर - MOHAMMAD RAFI AWARD

१८ व्या मोहम्मद रफी पुरस्कारांची अ‍ॅडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा पुरस्कार गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना जाहीर झालाय.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

मुंबई - १९५० आणि १९६० च्या दशकात हिंदी चित्रपटामधील आघाडीच्या तसंच सर्वात लोकप्रिय गीतकारांपैकी एक असलेल्या मजरूह सुलतानपुरी यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. तर हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये आवाज देणाऱ्या ख्यातनाम गायक जावेद अली यांना मोहम्मद रफी पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आलाय. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी आज केली.

मजरूह सुलतानपुरी यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव अंदलिब मजरूह सुलतानपुरी हे पुरस्कार स्वीकारतील.

मुंबई भाजपा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. यंदाचं वर्ष हे मोहम्मद रफी यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे.

पुरस्काराचं हे १८वं वर्ष असून एक लाखाचा धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असं जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप असून, ५१ हजार रू. रोख आणि मानचिन्ह असं रफी पुरस्काराचं स्वरूप आहे.

मोहम्मद रफी यांचे कुटुंबीय मंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. मोहम्मद रफी यांच्याबरोबर काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानं उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली.

यावर्षी गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि गायक जावेद अली यांना पुरस्कार जाहीर करताना आपल्याला अतिशय आनंद होतो आहे, असं सांगताना मंत्री आशिष शेलार म्हणाले. "कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारे आणि त्याकाळी फिल्मफेअर आणि दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणारे गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा प्रवास अत्यंत हृदयस्पर्शी आहे. त्यांना मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्काराने आणि प्रसिद्ध गायक जावेद अली यांना मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. रफी साहेबांचा १००वा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने या पुरस्काराचं एक वेगळं महत्त्व आहे.," असं शेलार म्हणाले.

वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वा सुरू होणार आहे. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे "फिर रफी" या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मद रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचं निवेदन रेडियो जॉकी असलेले आर. जे गौरव करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे.

यापूर्वी संगीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, सोनू निगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, संगीतकार उषा खन्ना, गायक उदित नारायण या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही या पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.