Cafe Madras Hotel on fire : चंद्रपूर शहरात कॅफे मद्रास हॉटेलला भीषण आग - चंद्रपूर शहरातील कॅफे मद्रास हॉटेल
🎬 Watch Now: Feature Video

शहरातील मध्यभागी असलेल्या कॅफे मद्रास या हॉटेलला आज (दि. 18 एप्रिल)रोजी सकाळी भीषण आग लागली. सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. ( Cafe Madras Hotel on fire ) सध्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोचले असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात कॅफे मद्रास हे हॉटेल स्थित आहे. शहरातील जुन्या हॉटेलांपैकी हे एक आहे. एका बाजूला लोकमान्य टिळक शाळा आहे. तर, दुसऱ्या बाजूला लक्ष्मीनारायण मंदिर आहे. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.