navrastrotsav 2022 : अंबाबाई दर्शनाला 15 लाख भाविक; भुक्ती मुक्ती प्रदायिनी रूपात देवीची पूजा - pooja in the form of Bhukti Mukti Pradayin
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर नवरास्त्रोत्सव ( navrastrotsav 2022 ) काळात करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाला भक्तांचा अक्षरशः महापूर लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सहाव्या दिवशी तब्बल 5 लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले ( 5 lakh devotees visited Ambabai ) आहे. मागील सहा दिवसात जवळपास 15 लाख भाविकांनी दर्शन घेतले असून, पुढच्या तीन दिवसांत भक्तांची संख्या अजून वाढण्याचा अंदाज आहे. आज सहाव्या दिवशी आई अंबाबाईची भुक्तीमुक्ती प्रदायिनी या रूपात सुंदर पूजा बांधण्यात आली होती. चतुर्भुजा आदिशक्ती पुढे भक्ती अर्थात राज्यप्राप्तीच्या अभिलाषा देवीची सेवा करणारा सुरथ राजा आणि मुक्तीच्या अपेक्षेने देवीची उपासना करणारा समाधी वैश्य या रूपात ही पूजा बांधण्यात आली आहे.