Ganesh festival 2022: मोतीचुर बुंदीचा 130 किलोचा आईस्क्रीम प्रसाद श्रीमंत दगडूशेठ हलवाईला अर्पण

By

Published : Sep 8, 2022, 1:09 PM IST

thumbnail

पुणे - यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेश उत्सव ( Ganesh festival 2022 ) होत असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ( Shrimant Dagdusheth Halwai Ganapati ) बाप्पा चरणी भाविकांच्या वतीने काही ना काही प्रसाद दिला जातो. पुण्यातील आईस्क्रीम बनवणाऱ्या ऐका व्यापाऱ्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा चरणी मोतीचुर बुंदीचा 130 किलोचा आईस्क्रीम प्रसाद अर्पण केला आहे. शहरातील प्रसिद्ध किगा आईस्क्रीम बनवणाऱ्या किरण साळुंखे आणि गणेश गोसावी या व्यापाऱ्याने मंडळाच्या 130 व्या वर्षानिमित्त 130 किलो वजनाचा मोतीचुर लाडू मिश्रित आईस्क्रीमचा प्रसाद गणपतीच्या चरणी अर्पण केला. 5 ते 6 दिवसाच्या परिश्रमाने हा आईस्क्रीमचा लाडू बनविण्यात आला आहे. गणपतीला अर्पण केल्यानंतर तो भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.