Raosaheb Danve Statement : तिकडून एखादा आरोप झाला की, आम्ही पुढचे पेनड्राईव्ह बाहेर काढू - रावसाहेब दानवे - Criticism of Raosaheb Danve

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 20, 2022, 2:23 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

जळगाव: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेनड्राईव्हमध्ये सत्यता आहे. तसेच अजून चार पेनड्राईव्ह पुढे येणार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते रावसाहेब दानवे ( BJP leader Raosaheb Danve ) यांनी केला आहे. तसेच महा विकास आघाडी सराकरकडून एखादा आरोप झाला की, आम्ही पुढचे पेनड्राईव्ह बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर पेनड्राईव्हमध्ये सत्यता नव्हती, तर मग अॅड प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला? असा सवालही रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे. पेनड्राईव्ह मध्ये सत्यता आहे म्हणूनच त्याच्या चौकशीची मागणी आम्ही केली आहे. त्यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. एमआयएम महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सोबत आली काय आणि गेली काय, याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमचा मुद्दा शिवसेनेपर्यंत आहे, ज्या दिवशी शिवसेनेने भाजपशी दगाफटका केला. त्याच दिवशी त्यांनी भगवा सोडून हिरवं पांघरल होत, अशी टीकाही रावसाहेब दानवे ( Criticism of Raosaheb Danve ) यांनी केली. महा विकास आघाडी सरकारमधील काही आमदारांनी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी कधीतरी उफाळून येणार आहे. ते बंड करतीलच योग्य वेळ आल्यावर ते कळेल, असा दावाही दानवे यांनी केला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Minister of State Abdul Sattar ) हे आपले चांगले मित्र आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाहीत, असं सांगत दानवे यांनी बोलणं टाळलं. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना त्यांनी अनेक वर्ष मनोरंजनच केले आहे. आता ते राष्ट्रवादीत गेले आहेत आणि ते आम्हाला मनोरंजन करत आहे असं म्हणत असतील तर ते चुकीचा आहे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा तळागाळापर्यंत जाऊन काम करत असतो, असं सांगत दानवेंनी खडसेंना टोला लगावला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.